२० ऑगस्टपासून जुन्या PoS मशीनना बंदी : खत विक्रीसाठी L1 बायोमेट्रिक मशीन अनिवार्य

45

The गडविश्व
गडचिरोली, दि.१८ : खत खरेदी-विक्रीतील पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी केंद्र सरकारने DBT (Direct Benefit Transfer) प्रकल्पांतर्गत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता खत विक्रेत्यांसाठी UIDAI मानकांचे L1 सुरक्षा प्रमाणपत्र असलेली बायोमेट्रिक PoS मशीन वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

काय आहे नवा नियम?

– जुन्या Lo PoS मशीन २० ऑगस्ट २०२५ नंतर बंद
– फक्त L1 बायोमेट्रिक PoS मशीन वापरूनच खत विक्री
– L1 मशीन नसलेल्या विक्रेत्यांना iFMS प्रणालीवर खत खरेदी-विक्री करता येणार नाही

मशीन मिळणार मोफत

कृषी आयुक्तालयाने परिपत्रक जारी करून सर्व खत विक्रेत्यांना २० ऑगस्टपूर्वी L1 PoS मशीन कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नवीन मशीन खत कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विक्रेत्यांसाठी सूचना

L1 मशीनसाठी खत उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
जुन्या Lo PoS मशीन वापरणाऱ्यांना २० ऑगस्टनंतर खत विक्री करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #खतविक्री #DBT #PoS #L1बायोमेट्रिक #कृषीविभाग #केंद्रशासन #शेतकरी #खततुटवडा #कृषिआयुक्तालय #gadchiroli #fertilizer #DBT #PoS #L1biometric #agriculture #centralgovernment #farmers #fertilizersupply #agricommissioner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here