The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : आष्टी तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रियंका पराग कुंदोजवार (वय २८) या विवाहित तरुणीने पती व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून १४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी आष्टी पोलिसांनी मृतक प्रियांकाचा पती पराग दिवाकर कुंदोजवार याला अटक केली असून शनिवारी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृतक प्रियांकाची आई सुवर्ण कत्रोजवार (रा. गडचिरोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पराग कुंदोजवार याच्यासह पल्लवी सुरेश वैरागडवार (रा. मानेवडा चौक, नागपूर), दिवाकर मुरलीधर कुंदोजवार, छाया दिवाकर कुंदोजवार, सुमित दिवाकर कुंदोजवार, सतीश चंद्रकांत कुंदोजवार, पूनम सतीश कुंदोजवार व व्यंकटेश मुरलीधर कुंदोजवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #chamorshi
