The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : निवडणूक आयोगावर दबाव टाकून, मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करून मतांची चोरी केल्याचा आरोप भाजपवर करत काँग्रेसने गडचिरोलीत जोरदार निदर्शने केली. या मतचोरीविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत भव्य कॅन्डल व मशाल मोर्चा काढण्यात आला.
मोर्चातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी “गली गली मै शोर है, मोदी सरकार चोर है”, “वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. मशालींच्या ज्वाळा आणि कॅन्डलच्या प्रकाशात लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश शहरभर पसरला.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, विविध तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
काँग्रेसने या निदर्शनांतून मतदार यादीतील घोटाळे, खोट्या नावांचा समावेश आणि मतदान केंद्रांवरील अनियमितता यांचा निषेध नोंदवला. पक्षाने जनतेला लोकशाहीच्या संरक्षणासाठी सजग राहण्याचे आवाहन केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice ##Gadchiroli #CandleMarch #TorchRally #CongressProtest #VoteFraud #Democracy #PoliticalProtest #ElectionRigging #GadchiroliNews #MashaMorcha #गडचिरोली #मशालमोर्चा #कॅन्डलमोर्चा #काँग्रेसआंदोलन #मतचोरी #लोकशाही #निवडणूकघोटाळा #राजकीयआंदोलन #गडचिरोलीबातमी #भव्यमोर्चा
