– गडचिरोलीत मंडल यात्रेचे भव्य स्वागत, महिलांकडून ‘एक राखी मंडल के लिये’चा अनोखा संदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : नागपूर येथून ९ ऑगस्ट रोजी प्रारंभ झालेली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची मंडल यात्रा आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयात दाखल झाली. ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेने गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले.
राजापूरकर म्हणाले, “मंडल आयोगाच्या विरोधात भाजपने पूर्वी ‘कुमंडल यात्रा’ काढत ओबीसी समाजाविरोधी भूमिका घेतली होती. आज ओबीसींना खरा न्याय द्यायचा असेल, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः ‘मंडल यात्रा’ काढावी.”
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि ३५८ तालुक्यांतील गावागावात पोहोचून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करणार आहे.
गडचिरोलीत प्रवेश करताच महिलांनी ‘एक राखी मंडल के लिये’ हा अनोखा नारा देत सहभागी बांधवांच्या हातावर राखी बांधली, ज्यातून एकात्मता आणि हक्कांसाठी लढण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, उपाध्यक्ष नाईन शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews
