The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि. १२ : धानोरा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 113 बटालियनतर्फे “हर घर तिरंगा” अभियानाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या उपस्थितीत 11 ते 14 ऑगस्टदरम्यान पॅडल रॅली व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. धानोरा तालुक्यातील विविध ठिकाणी नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय मार्ग 930 वर पोलीस स्टेशन धानोरा येथून नगर पंचायतमार्गे पंचायत समितीपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत “भारत माता की जय”च्या घोषणा घुमल्या. कमांडंट जसवीर सिंग यांनी रॅलीदरम्यान सांगितले की, “हर घर तिरंगा” मोहीम 2022 मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून सुरू झाली आणि आता ती देशव्यापी जनचळवळ बनली आहे. तिरंगा हा आपल्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक असून प्रत्येकाने आपल्या घरावर तो फडकवावा, हीच या मोहिमेची भावना आहे.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी अशोक नारायण, प्रदीप कुमार त्रिपाठी, एम.आर. अन्सारी, गुलाबसिंग, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, अधिकारी, जवान, त्यांच्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #harghartiranga
