महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल १५ हजार पदभरती ; ओएमआर पद्धतीने होणार लेखी परीक्षा

1268

– २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच संधी
The गडविश्व
मुंबई, दि. १२ : राज्यातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल १५ हजार ११४ पदांची मोठी भरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या भरतीला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारांनाही एकदाच संधी देण्यात आली आहे.
राज्याच्या पोलिस दलात २००४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती घेण्यात येणार आहे. या भरतीत पोलीस शिपाई – १०,९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बँड्स मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २,३९३ आणि कारागृह शिपाई – ५५४ पदांचा समावेश आहे. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही गट-क संवर्गातील पदे जिल्हास्तरावरून भरली जाणार असून, लेखी परीक्षा ओएमआर (OMR) पद्धतीने घेण्यात येईल.
भरतीची संपूर्ण प्रक्रिया – अर्ज मागवणे, छाननी, शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा – राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
रिक्त पदांमुळे पोलीस दलावर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आणि कारागृह व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून वेळोवेळी निर्देश दिले गेले होते. तसेच, विधिमंडळातील चर्चांमध्येही लोकप्रतिनिधींनी या भरतीची मागणी वारंवार केली होती. आता मंजुरीनंतर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice
#MaharashtraPoliceRecruitment #PoliceBharti2025 #OMRExam #MaharashtraJobs #PoliceConstable #GovernmentJobs #JobAlert #पोलीसभरती #महाराष्ट्रपोलीस #नोकरी2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here