वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी डिगोळे यांना जागतिक हत्ती दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर गौरव

88

– उल्लेखनीय कार्याची घेतली दखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जागतिक हत्ती दिन (World Elephant Day) निमित्त कोलकाता, पश्चिम बंगाल येथील Stripes and Green Earth Foundation (SAGE Foundation) तर्फे गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धन व मानव-हत्ती संघर्ष निवारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी बालाजी हरीभाऊ डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), वडसा यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रानटी हत्तींचा वावर असून, त्यांची हालचाल आणि वर्तन यावर सतत लक्ष ठेवणे तसेच गावकऱ्यांना सावधगिरीचे मार्गदर्शन करणे हे आव्हानात्मक कार्य डिगोळे यांनी अत्यंत दक्षतेने पार पाडले आहे. शास्त्रीय पद्धतींचा वापर, स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय, तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकाची जलद हालचाल यामुळे अनेक मानवी व वन्यजीवांचे प्राण वाचवण्यात यश आले.
SAGE Foundation ही संस्था देशभरात वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन व शाश्वत सहअस्तित्वासाठी कार्यरत असून, दरवर्षी जागतिक हत्ती दिनी हत्ती संरक्षण व व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान देणाऱ्यांचा गौरव करते. या वर्षी डिगोळे यांची निवड त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धती, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आली.
या सन्मानाबद्दल डिगोळे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्यासाठीच नव्हे तर गडचिरोलीतील संपूर्ण वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याचा सन्मान आहे. हत्तींसोबत सुरक्षित सहजीवनासाठी हे कार्य पुढेही सुरू राहील.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #WorldElephantDay #SAGEFoundation #वनपरिक्षेत्रअधिकारी #वन्यजीवसंवर्धन #HumanElephantConflict #गौरव #राष्ट्रीयसन्मान #रानटीहत्ती #वडसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here