दहीहंडीच्या सरावात ६ व्या थरावरून कोसळून ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

44

The गडविश्व
मुंबई, दि. १२ : दहीहंडीच्या उत्साहावर पाणी फेरत दहिसरच्या केतकीपाडा परिसरात रविवारी रात्री सरावादरम्यान ११ वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर येत आहे. नवतरूण मित्रमंडळ पथकाचा सदस्य असलेला महेश रमेश जाधव (वय ११) हा चिमुकला ६ व्या थरावरून कोसळून गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले.
१६ ऑगस्टला होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईत तयारी शिगेला पोहोचली आहे. गाण्यांच्या सुरांत, विविध पथके रात्रभर मानवी मनोरे रचण्याचा सराव करत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या हंड्यांसाठी राजकीय पक्षही स्पर्धेत उतरल्याने थर उंचावण्याची शर्यत अधिकच तीव्र झाली आहे. मात्र या थरांच्या स्पर्धेत एका चिमुकल्याचा जीव गेला आहे.
दहिसरच्या केतकीपाडा येथे रात्रीच्या सुमारास ६ थर रचले जात होते. महेश हा वरच्या थरावर चढलेला असताना तोल जाऊन तो खाली कोसळला. झेलण्याआधीच तो थेट जमिनीवर आदळला. तातडीने त्याला दहिसर पूर्वेतील प्रगती रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी आयोजक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून. सरावावेळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था न केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #दहिसर #दहीहंडी #मुंबई #गोविंदा #अपघात #दुर्घटना #पोलीस #दहीहंडीसराव #उत्सव #Mumbai #Dahihandi #Accident #Govinda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here