– पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०९ : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा येथे रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हरितसेना व इकोक्लबच्या वतीने ९ ऑगस्ट २०२५ रोजी वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
झाडाला राखी बांधून बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी जशी भाऊ घेतो, तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. शालेय परिसरातील झाडांना राखी बांधून पर्यावरण वाचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे होते. प्रमुख अतिथी म्हणून पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, कु. आर. जी. मडावी आणि हरीश पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन हरितसेना प्रभारी एस. एम. रत्नागिरी यांनी केले, तर आभार कु. समीक्षा सोनुले हिने मानले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanoranews #RakshaBandhan #TreeConservation #EcoClub #NationalGreenArmy #EnvironmentalAwareness #TreeProtection #Gadchiroli #Dhanora #GreenInitiative #NaturePreservation
