– दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
The गडविश्व
नवी दिल्ली, दि. ०५ : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून देण्यात आली आहे. https://x.com/SatyapalMalik6/status/1952638769036742776?s=19
सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरसोबतच गोवा आणि मेघालय या राज्यांमध्येही राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली होती. कॉलेज जीवनातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव असलेले मलिक हे नंतर भाजपमध्ये दाखल झाले होते. खासदार ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास राहिला.
राज्यपालपदावर असताना विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे आणि भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनात त्यांनी उघडपणे सहभाग घेतला होता. तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात त्यांनी देशभर दौरे करून सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी थेट आरोप केले होते.
त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सत्यपाल मलिक हे स्पष्टवक्ते, निर्भीड आणि तत्त्वनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #सत्यपालमलिक #माजीराज्यपाल #JammuKashmir #राजकारण #भाजप #शेतकरीआंदोलन #मृत्यू #राममनोहरलोहियारुग्णालय #BreakingNews #IndiaPolitics #Society #NewsMarathi
