– सहा आरोपींना अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून, तब्बल २,२४,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोतेपल्ली (रै) परिसरातील जंगलात अवैधरित्या भरलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशावरून रेगडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या देखरेखीखाली पोउपनि. कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वात पथकाने जंगलात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी पळून गेले, मात्र पांडुरंग तिम्मा, ऋषी तिम्मा, महेंद्र कुलेटी, विजय कुलेटी (सर्व पोतेपल्ली रै), करण बिश्वास (शिमुलतला), व शामल अहीरवार (चंद्रपूर) या सहा जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात ५ दुचाकी, ११,७७०/- रु. रोख रक्कम, ३ झुंजीचे कोंबडे, ३ काती (लोखंडी) व इतर साहित्य असा एकूण २,२४,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधितांविरुद्ध रेगडी पोलीस ठाण्यात गुन्हा कलम १२(ब) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक मधुकर सूर्यवंशी तपास करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, प्रशासनाचे गोकुल राज जी व उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत नापो मालु पंगाटी, पो.आं. सचिन निमगळे, शिवा आडे, जितेंद्र बोलीवार, गुलशन आत्राम, संदीप खेडकर, सुनील गेडाम, आशीष सोनमनवार, सुनील मडावी व विवेक घोडीचोर सहभागी होते.
गडचिरोली पोलिसांकडून दुर्गम भागातील अशा अवैध कोंबडा बाजारांवर ठोस पावले उचलण्यात येत असून, पुढील कारवायाही याच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #gadchirolipolic #CockfightRaid #IllegalGambling #GadchiroliPolice #CockfightCrackdown #GamblingBust #MaharashtraNews #CrimeNewsIndia #PoliceAction #GadchiroliUpdates #AntiGamblingDrive #कोंबडा_बाजार #अवैधजुगार #गडचिरोलीपोलिस #झुंजविरोधीकारवाई #पोतेपल्ली #नीलोत्पल #गडचिरोलीबातमी #जुगारकारवाई #गुन्हेवार्ता #MaharashtraPolice
