मार्कंडा मंदिर जीर्णोद्धार कामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

67

– कामास गती देण्याचे स्पष्ट निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले प्राचीन हेमाडपंथी मार्कंडा मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी सुरु झालेले हे काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
ही बाब गांभीर्याने घेत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी नुकतीच मंदिर परिसरात भेट देत पुनर्बांधणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी कामाच्या धीम्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली आणि जलद व दर्जेदार काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
याआधीही डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला गती देण्याचे आदेश दिले होते, मात्र अपेक्षित प्रगती न झाल्याने हरनघाट येथील मुरलीधर महाराज यांनी 108 दिवसांची वैनगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू केली आहे. दररोज 51 किमी अंतर पार करत भाविक ही यात्रा मार्कंडा-रामाडा-घारगाव-हरनघाट-उसेगाव-शिरशी-लोंढोली-चिचडोहमार्गे करत आहेत. याबाबत माहिती मिळताच खासदार डॉ. किरसान यांनी मुरलीधर महाराजांची भेट घेऊन अभिप्राय जाणून घेतला आणि लगेचच मंदिर परिसरात जाऊन कामाची पाहणी केली.
यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी डॉ. अरुण मलिक, नीरज तिवारी, शुभम कोरे, तसेच नायब तहसीलदार कावळे, स्थानिक जनप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नगरसेवक सुमेध तुरे, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सरपंच संगीता मोगरे, माजी सरपंच मुखरु शेंडे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. किरसान यांनी यापूर्वीही संसदेत या कामासाठी विशेष निधीची मागणी केली असून, “हे पवित्र व ऐतिहासिक मंदिर भाविकांसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी पुढेही सतत पाठपुरावा करणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मार्कंडा मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास नेण्यासाठी आता स्थानिक यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे, तर भाविकांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #MarkandaTemple #NamdevKirsan #TempleRestoration #Gadchiroli #ArchaeologyDepartment #HeritageConservation #HemadpanthiTemple #VainGangaPadayatra #MurliDharMaharaj #CulturalHeritage #VidarbhaKashi #IndianHeritage #MPVisit #MonumentRestoration
#मार्कंडा_मंदिर #डॉ_नामदेव_किरसान #जीर्णोद्धार #गडचिरोली #पुरातत्त्वविभाग #मार्कंडा_पुनर्बांधणी #हेमाडपंथी_मंदिर #वैनगंगा_पदयात्रा #श्री_मुरलीधर_महाराज #लोकप्रतिनिधी #विरासत_संवर्धन #विदर्भाची_काशी #संस्कृती_संरक्षण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here