The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.२७ : रानटी हत्तीच्या धानोरा शहरात झालेल्या अचानक प्रवेशामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरुमगाव परिसरातील बेलगाव येथील घरांचे नुकसान करत हा हत्ती २६ जुलैच्या रात्री सालेभट्टी गावाच्या दिशेने गेला. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान सालेभट्टी ग्रामपंचायत जवळील भागात त्याचे दर्शन झाल्याने गावात खळबळ उडाली.
यानंतर हत्तीने आपला मोर्चा थेट धानोरा शहराकडे वळवला. महसूल मंडळ कार्यालयाजवळून, स्टेडियम परिसर व धानोरा पोलीस स्टेशन मार्गे तो कनारटोला भागातून पुन्हा जंगलात निघून गेला. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास हत्ती धानोरा शहरात दिसल्याने अनेक नागरिकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले.
या प्रकारामुळे धानोरा शहरासह संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #धानोरा_हत्तीचा_धमाका #रानटी_हत्ती_धानोरात #भीतीचे_वातावरण #गडचिरोली_वनजिव #सालेभट्टी_हत्ती #वनविभाग_सतर्कता #हत्तीची_शहरी_एण्ट्री #धानोरा_आतंक #हत्तीचा_थैमान #जंगलातून_शहरात #WildElephantInDhanora #ElephantTerror #ForestToCityEntry #DhanoraUnderFear #SalebhattiElephant #GadchiroliWildlife #ElephantRampage #UrbanWildIntrusion #ForestDeptAlert #DhanoraElephantCrisis
