गडचिरोलीत बोगस कीटकनाशक विक्रेत्यांना दणका ; ६४ लाखांचा साठा जप्त, ४ परवाने रद्द

870

The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : खरीप हंगामाच्या तोंडावर गडचिरोली जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा भरारी पथक तयार करून कारवाईचा धडका सुरू केला आहे. या पथकांनी गेल्या आठवड्यात विविध कृषी केंद्रांवर अचानक छापे टाकून तपासण्या केल्या असता अनेक ठिकाणी गंभीर अनियमितता आढळून आल्या. काही केंद्रांवर इ-पॉस साठा व प्रत्यक्ष साठ्यात तफावत, दरफलक व साठा फलक न लावणे, परवाने व उगम प्रमाणपत्र अद्ययावत नसणे तसेच विक्रीसाठी मुदतबाह्य कीटकनाशके ठेवलेले असल्याचे स्पष्ट झाले. काही दुकानांमध्ये परवाना नसताना खते आणि कीटकनाशके विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, तर काहींचे परवाने वेळेत नुतनीकरण केले गेले नव्हते. या कारवाईत एकूण ६४.४२ लाख रुपये किंमतीचा कीटकनाशक साठा जप्त करून त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून ४ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ५ केंद्रांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा खुलासा समाधानकारक न ठरल्यास परवाने निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोगस निविष्ठा विक्रेत्यांमध्ये या कारवाईने मोठी खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांची फसवणूक थांबवणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यापुढेही अशा अचानक तपासण्या सुरूच राहणार असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खते किंवा कीटकनाशके खरेदी करताना पक्की पावती घ्यावी व कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण क्रमांक 8275690169 वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #कृषीविभाग #बोगसनिविष्ठा #कीटकनाशककारवाई #शेतकरी_सुरक्षा #भरारीपथक #परवाने_रद्द #कृषी_छापे #बोगसकीटकनाशके #खरीपहंगाम #Gadchiroli #AgricultureDepartment #FakePesticides #LicenceCancelled #FarmersRights #AgriRaid
#CrackdownOnFakeInputs #AgricultureScam #PesticideBan #AntiFraudAction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here