– शेतकऱ्यांना पट्टा पेर पद्धतीचे प्रशिक्षण
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज (वडसा), दि. २७ : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान २०२५-२६ अंतर्गत धान पिकावर ओळीत पूर्णलागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या प्रात्यक्षिकात सहभागी शेतकऱ्यांना PKV तिलक या वानाचे बियाणे देण्यात आले असून, त्यावर सूक्ष्म जीवाणू संवर्धनाद्वारे बीज प्रक्रिया करण्यात आली. बेड पद्धतीने पेरणी करून उत्पादन वाढीच्या दृष्टीने विविध आधुनिक लागवड तंत्रांचा अवलंब करण्यात आला.
प्रात्यक्षिकामध्ये २० बाय २० सें.मी. अंतरावर ओळीत रोवणी, ओळीत पूर्ण लागवड आणि प्रत्येक १२ ओळींनंतर १ फूटाचा पट्टा सोडणे अशा पद्धतींचा समावेश करण्यात आला. या पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी सावंगी येथील सहायक कृषी अधिकारी तुषार टिचकुले यांनी मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत बोधे यांनी “पट्टा पेर पद्धतीचे फायदे” शेतकऱ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितले. उत्पादनात वाढ, कीड नियंत्रण, श्रम व खर्चात बचत अशा अनेक फायद्यांची माहिती शेतकऱ्यांनी समजून घेतली.
या उपक्रमामुळे आधुनिक शेतीतंत्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्यास मदत होणार असल्याची भावना सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #सावंगी #राष्ट्रीयअन्नसुरक्षाअभियान #धानपिक
#प्रात्यक्षिकशेती #कृषीतंत्रज्ञान #पट्टापेरपद्धत #शेतीशाळा #कृषीविभाग #शेतकरीप्रशिक्षण #गडचिरोलीकृषी #Savangi #NFSA2025
#PaddyDemonstration #AgricultureTraining #StripCropping #ModernFarming #FarmersAwareness #AgriDepartment #GadchiroliFarming #SustainableAgriculture
