The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. २६ : वडिलांच्या भेटीसाठी निघालेला कोरची तालुक्यातील नांदळी येथील एक युवक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एटापल्ली तालुक्यातील आलदंडीजवळ झालेल्या अपघातात जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून, मृत युवकाची ओळख शनिवारी दुचाकीच्या नंबर प्लेटवरून पटली.
मृतकाचे नाव भाविक माहत्या नैताम (वय ३० वर्षे, रा. नांदळी, ता. कोरची) असे आहे. तो आपल्या वडिलांना भेटण्यासाठी दुचाकीने नांदळीहून एटापल्ली तालुक्यातील गट्टा गावाकडे निघाला होता. गट्टा येथे त्यांचे वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, आलदंडी ते पुरसोलगोंदी रस्त्यावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या भीषण धडकेत भाविक याचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नव्हती; मात्र आज दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरील नंबरवरून त्याची ओळख निश्चित करण्यात आली.
या दुर्घटनेमुळे नांदळी आणि गट्टा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एक तरुण आयुष्याच्या उंबरठ्यावरून अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे शोकस्वरूप वातावरण पसरले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #BikeAccident #YouthDies #GadchiroliNews #Etapalli #Korchi #RoadAccident #FatalCrash #Aladandi #TragicDeath #MaharashtraNews #दुचाकीअपघात #नांदळी #कोरची #एटापल्ली #आलदंडी #अपघातीमृत्यू #गडचिरोलीवार्ता #मुलगामृत्युमुखी #रस्ताअपघात #गडचिरोलीन्यूज
