– १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत नवेगाव (ता. धानोरा) येथील आठ दारुविक्रेते गजाआड केले. गडचिरोली पोलीस ठाणे आणि पोमके कारवाफा येथील पोलिस पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई करत तब्बल १,८४,४०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे.
२५ जुलै रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली. नवेगाव येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली आणि पोमके कारवाफा येथील पथकांनी संयुक्तपणे पायी जाऊन कारवाई केली. मोहिमेदरम्यान आठ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये ९९,४०० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली, तसेच ८५,००० रुपयांची गावठी दारू आणि हातभट्टीचे साहित्य नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी प्रभुदास शिशु गावडे, पंचफुला सुरेश नरोटे, मनिषा केशव तुमरेटी, निलिमा वसंत तुमरेटी, दिलीप शिशु गावडे, अशोक तुळशीराम पदा, जैराम बुधाजी गावडे आणि परशुराम पांडुरंग तुमरेटी (सर्व रा. नवेगाव) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे (कारवाफा) व सुरज जगताप (गडचिरोली) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत पोनि. विनोद चव्हाण, पोउपनि. मारबोनवार, पोहवा संजय पोल्लेलवार, प्रेमकुमार भगत, गुलाब कामतकर (गडचिरोली पोलीस ठाणे) तसेच पोउपनि. संतोष कदम, मपोउपनि. सुनिता शिंदे आणि इतर कर्मचारी (पोमके कारवाफा) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
#thegdv #thegadvishva #crimenews #gadchirolipolice #gadchirolinews #GadchiroliPolice #LiquorBanAction #IllegalLiquorRaid #GadchiroliNews #PoliceOperation #DesiLiquor #AntiLiquorDrive #MaharashtraPolice #CrimeControl #GadchiroliUpdates
#गडचिरोली_पोलिस #दारुबंदी_कारवाई #अवैध_दारू_विक्री #गडचिरोली_बातमी #पोलीस_मोहिम #गावठी_दारू #गडचिरोली_जिल्हा #पोलीस_धडाकेबाज_कारवाई #नीलोत्पल_गडचिरोली #गडचिरोली_वृत्त
