“स्वार्थासाठी भाजपात, आता काँग्रेसमध्ये खोटेपणाचा आधार” – भाजपाचा गावडे यांच्यावर घणाघात

262

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ता. २७ : “पेंढरी–गठ्ठा क्षेत्रातून भाजपातून शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल” अशा बातम्यांचा सध्या प्रचार सुरू असतानाच भाजप तालुका धानोरा तर्फे या कथित घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या कथित बातम्या पूर्णतः खोट्या व दिशाभूल करणाऱ्या असून, यामागचा खरा हेतू म्हणजे परमेश्वर गावडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना स्वतःचा ‘मोठेपणा’ दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, असा आरोप भाजपने केला आहे.
दुर्गापूर येथील सरपंच परमेश्वर गावडे हे कधीही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सदस्य नव्हते, असा स्पष्ट खुलासा भाजपाने केला आहे. गावडे यांचा भाजपातील प्रवेश हा स्वार्थापोटी झालेला होता, पक्षनिष्ठा किंवा विचारधारेशी त्याचा संबंध नव्हता, असे भाजपने ठामपणे म्हटले आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गावडे यांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रत्यक्ष प्रचार करून आपली खरी भूमिका अधोरेखित केली होती. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करताना “भाजपातून शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन गेलो” असा दावा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात येत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
गावडे यांच्या सोबत गेलेल्या २०–२५ लोकांपैकी कोणीही भाजपच्या अधिकृत कार्यकारिणीचा भाग नव्हता, ना तालुका स्तरावर, ना मंडळ स्तरावर. त्यामुळे हा सर्व प्रकार केवळ बनावट प्रचाराचा भाग असून, कार्यकर्त्यांच्या भावना फसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
“भाजप ही विचारधारेवर उभी असलेली संघटना असून, येथे स्थान, सन्मान हे निष्ठेच्या आधारे मिळते. खोट्या बातम्यांच्या आधारे मोठेपणा मिळवता येत नाही,” असे भाजप तालुका धानोरा तर्फे सांगण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #BJP #Congress #ParmeshwarGawde #Dhanora #PoliticalControversy
#FakeNews #PartySwitch #GadchiroliPolitics #BJPTalukaDhanora #SelfishPolitics #भाजप #काँग्रेस #परमेश्वरगावडे #धानोरा #राजकीयविवाद #खोट्याबातम्या #पक्षांतर #गडचिरोलीराजकारण #भाजपप्रेसनोट #स्वार्थीराजकारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here