– कारवाईची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : तालुक्यातील रांगी, निमगाव, बोरी आणि मोहटोला परिसरात ट्रॅक्टर बॅटरी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, खरिप हंगामात ट्रॅक्टरधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अंधाराचा फायदा घेत रात्री घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमधून बॅटऱ्या चोरीला जात असून, या घटनांमुळे परिसरात चिंतेचं वातावरण आहे.
शेतात सध्या चिखल करण्याची, नागरनीची कामं जोमात सुरू आहेत. अशावेळी ट्रॅक्टर बॅटरी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण शेती कामांनाही अडथळा निर्माण होतो.
बॅटरी चोरीचा तपास अद्याप लागलेला नसून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व ट्रॅक्टरधारकांनी केली आहे. या चोरीचे सत्र थांबले नाही तर आणखी मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ट्रॅक्टरबॅटरीचोरी #धानोरा #रांगीपरिसर #शेतीअडचण #ग्रामस्थांचीमागणी #पोलीसकारवाईचीमागणी
#TractorBatteryTheft #GadchiroliNews #FarmerTrouble #RuralTheft #BatteryStolen #MonsoonFarmingCrisis
