– ग्रामस्थांची ग्रामपंचायतीकडे मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.१८ : चातगाव येथील मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर गुरेढोरे ठाण मांडून बसत असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेक वेळा ही जनावरे अचानक वाहनांसमोर येतात, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि शाळकरी मुलांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. लहान मुलांना पाहून काही वेळा ही जनावरे आक्रमक होण्याची शक्यता असून, संभाव्य जीवितहानी नाकारता येत नाही.
ग्रामस्थांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. मोकाट जनावरांना कांजी घरात पाठवल्यास एकीकडे रस्त्यावरील अडथळा दूर होईलच, शिवाय मालकांना दंड भरावा लागल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीने वेळेत लक्ष न दिल्यास अपघात किंवा जीवितहानीस जबाबदार कोण? असा सवालही आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने चातगावमध्ये मोकाट जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Chatgaon #StrayCattle #TrafficObstruction #GramPanchayat #Dhanora #AccidentRisk #GadchiroliNews #PublicSafety #CattlePound #LocalDemand
#चातगाव #मोकाटजनावरे #रहदारीअडथळा #ग्रामपंचायत #धानोरा #अपघातधोका #गडचिरोली बातमी #सार्वजनिकसुरक्षा #कांजिघर #ग्रामस्थांचीमागणी
