– दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ, मुक्तीपथ संघटनेचीही सक्रिय साथ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : धानोरा शहरातील अवैध दारूविक्रीला आळा बसवण्यासाठी धानोरा पोलिसांनी मुक्तीपथच्या पथकासह संयुक्त धाड टाकत मोठी कारवाई केली. या छाप्यामध्ये ३७ देशी व ६ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भजनराव गावडे, शिपाई प्रवीण राऊत, मंगेश राऊत, जनहेर उसेंडी तसेच मुक्तीपथचे तालुका संघटक राहुल महाकुलकर, उपसंघटक भास्कर कड्यामी, प्रेरक बुधाताई पोरटे, शितल गुरनुले यांनी ही कारवाई केली.
पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुढील काळात अशा कारवायांचे सत्र अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews