– लाईट नाही पण रक्कम भरमसाठ, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ११ : तालुक्यातील रांगी परिसरात विद्युत खंडितीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून ट्रि कटिंगसारख्या उपाययोजना करूनही या समस्येवर ठोस तोडगा न निघाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. यासोबतच मे महिन्यात न घेतलेल्या मीटर रिडिंगमुळे जून महिन्याचे बिलसह एकाचवेळी दोन महिन्यांचे विद्युत बिल येणार असल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
रांगी हे धानोऱ्यापासून १८ कि.मी. अंतरावर असलेले मोठे बाजारपेठ क्षेत्र असून येथे अनेक खेडी जोडलेली आहेत. नागरिक दैनंदिन व्यवहारांसाठी रांगी येथे येतात. मात्र, वारंवार होणाऱ्या विद्युत खंडितीमुळे त्यांचे सर्व व्यवहार ठप्प होतात. लाईट गेले की ती पुन्हा किती वेळाने येईल याचा नेम नसतो, परिणामी अनेकांना काम अर्धवट टाकून माघारी जावे लागते.
जंगलातून आलेल्या विद्युत वाहिन्यांवर दरवर्षी ट्रि कटिंग केले जाते, मात्र यामुळे काही वेळापुरती सुधारणा होते, पुन्हा तसाच खोळंबा सुरू होतो. रांगीसाठी धानोऱ्यावरून येणारी लाईन ही जुनी असून तिची यंत्रणा पूर्णपणे मोडकळीला आलेली आहे. खांब, वायरिंग आणि ट्रान्सफॉर्मर बदलण्याची नितांत गरज आहे.
दरम्यान, मे महिन्यात मीटर रिडिंगच न झाल्याने जून महिन्यात एकत्रित दोन महिन्यांचे बिल नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे लाईट नसलं तरी बिल मात्र आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
“लाईट नाही, पण बिल मात्र वेळेवर आणि भरमसाठ – हा न्याय आहे का?” असा सवाल रांगीवासीयांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी या समस्येकडे विद्युत महामंडळाने गांभीर्याने पाहावे, ट्रि कटिंगपुरते मर्यादित न राहता संपूर्ण लाईन यंत्रणा अद्ययावत करून, रांगी परिसरात स्थायिक आणि नियमित वीज पुरवठा व्हावा, अशी ठाम मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolipolice #रांगी #धानोरा #विद्युतसमस्या #वीजखंडित #ट्रिककटिंग #बिलवाढ #ग्राहकत्रास #महावितरण #वीजपुरवठा #Rangi #Dhanora #PowerCut #ElectricityIssue #TreeCutting #DoubleBilling #MSEDCL #ConsumerGrievance #PowerSupplyProblem
