– समाज कल्याण विभागाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काची जबरदस्तीने वसुली केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य थेट प्रशासनाच्या कारवाईस सामोरे जातील, असा इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे.
शैक्षणिक सत्र 2018-19 पासून भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेतून महाडिबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क जमा केले जात आहे. हे शुल्क मिळाल्यानंतर महाविद्यालयांनी तत्काळ आपली रक्कम विद्यार्थ्यांकडून न घेता शासन प्रणालीमार्फत स्वीकारावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे अडवून किंवा अन्य प्रकारे अडवणूक करून शुल्काची मागणी केल्यास, संबंधितांनी समाज कल्याण विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी दिलेल्या सूचनेनुसार, कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास कठोर प्रशासकीय कारवाई होईल.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Scholarship #SocialWelfareDepartment #Gadchiroli #BackwardClassStudents #Mahadbt #EducationalFees #GovernmentDirective #RightToEducation #ActionAgainstPrincipals #SCStudentsRights #शिष्यवृत्ती #समाजकल्याणविभाग #गडचिरोली #मागासवर्गीयविद्यार्थी #महाडिबीटी #शैक्षणिकशुल्क #शासननिर्देश #शिक्षणअधिकार #प्राचार्यावरकारवाई #SC_StudentsRights