– जनतेतून अभिनंदनाचा वर्षाव
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. १० : आरमोरी विधानसभा क्षेत्रात पूरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले असतानाही, राज्य विधीमंडळाचे अधिवेशन चालू असतानाही आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. रस्ते बंद असतानाही त्यांनी बडेजाव टाळून लोकल ट्रेनने प्रवास करत देसाईगंज गाठले. त्यांच्या या साधेपणाच्या कृतीचे सर्वसामान्यांनी कौतुक केले आहे.
गुरुवारी (दि. १० जुलै) दुपारी १२ वाजता, त्यांनी ब्रह्मपुरी येथे वाहन सोडून बल्लारशाह–गोंदिया लोकल ट्रेनने प्रवास केला व देसाईगंज शहर गाठले. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने झालेले नुकसान पाहण्यासाठी ते थेट बांधावर पोहचले.
या प्रवासादरम्यान त्यांनी लोकल ट्रेनमधील प्रवाशांशी संवाद साधत पूर परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर सामान्य माणसासारखे त्यांनी वागणे पत्करले. त्यांच्या या साधेपणाच्या व जमीनीवर उतरून मदतीसाठी तत्पर राहिलेल्या वृत्तीचे जनतेतून खुलेहस्ते स्वागत होत आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर शासन स्तरावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MLARamdasMasram #FloodRelief #Desaiganj #ArmoriConstituency #LocalTrainJourney #MLAAmongPeople #WaingangaFloods #FarmerSupport #GroundLevelLeadership #MaharashtraPolitics #रामदासमसराम #पूरपरिस्थिती #शेतकरीमदत #देसाईगंज #आरमोरीमतदारसंघ #लोकलट्रेनप्रवास #जनतेतघातलेला #वैनगंगापूर #प्रत्यक्षनेतृत्व #महाराष्ट्रराजकारण