नवोन्मेष शिक्षणाला चालना : अकोला येथे अटल टिंकरिंग HM ओरिएंटेशन उत्साहात पार

55

The गडविश्व
अकोला , दि. १० : अटल टिंकरिंग लॅब उपक्रमाअंतर्गत अमरावती विभागीय स्तरावरील प्रमुखाध्यापक ओरिएंटेशन सत्र अकोला येथे प्रेरणादायी वातावरणात पार पडले. नवोन्मेष शिक्षणाच्या दिशेने शालेय नेतृत्वाला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित या सत्राला पाचही जिल्ह्यांतील प्रमुखाध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील एकूण ६८ प्रमुखाध्यापकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमात अटल टिंकरिंग लॅबची संकल्पना, तिचे उद्दिष्ट, अंमलबजावणीतील अडचणी आणि शैक्षणिक लाभ याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्य रत्नमाला खडके, नितीन भालचक्र, कविता बुर्घाटे, वर्षा मोरे, अरुंधती जाधव, तुषार कुचेकर, मोहम्मद शाहिद, आशा लाटकर, मिलिंद भैसारे व ईश्वर मुंडले यांची उपस्थिती होती.
अरुंधती जाधव यांनी ATL मॉडेलचे सविस्तर विवेचन करत विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. तसेच ‘Lend A Hand India’ या संस्थेच्या सहकार्याने ATL प्रयोगशाळा उभारणी व संचालनाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता अत्यंत सकारात्मक वातावरणात झाली. विचारमंथन, प्रश्नोत्तरं आणि अनुभवांची देवाणघेवाण यामध्ये प्रमुखाध्यापकांचा सहभाग लक्षणीय ठरला. नवोन्मेषाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या उपक्रमास लाभलेला सकारात्मक प्रतिसाद हा विभागीय शैक्षणिक वातावरणासाठी आश्वासक ठरला.
सूत्रसंचालनाची जबाबदारी मिलिंद भैसारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

#अटल_टिंकरिंग_लॅब #HMओरिएंटेशन #नवोन्मेष_शिक्षण #अकोला #अमरावतीविभाग #शालेयनेतृत्व #ATLकार्यशाळा #DIET #LendAHandIndia #कृतीशील_शिक्षण

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here