The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये विविध तालुक्यांत जोरदार पावसाची नोंद झाली असून, एकूण जिल्हा सरासरी ५७.७ मिमी इतकी नोंदवली गेली आहे. देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १९६.० मिमी पावसाची नोंद होऊन तो जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा भाग ठरला आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमीमध्ये) :
देसाईगंज – १६८.०
कोरची – १४५.६
कुरखेडा – १०३.७
आरमोरी – ८४.८
धानोरा – ८३.७
गडचिरोली – ४७.४
एटापल्ली – २४.७
चामोर्शी – ११.७
मुलचेरा – ११.६
भामरागड – ४.०
सिरोंचा – ३.९
आहेरी – ३.७
जिल्ह्यातील ४३ पैकी १२ वर्तुळांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rainfall) नोंदवला गेला असून खालील वर्तुळांत ८० मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदले गेले:
पुराडा (ता. कुरखेडा) – ११०.४
कुरखेडा – ९८.७
वैरागड (ता. आरमोरी ) – ९५.०
धानोरा – ९०.२
देऊळगाव – ९०.०
पेंढरी – ८९.४
मुरुमगाव – ८६.४
मालेवाडा – ८५.१
पिसेवडधा – ८२.०
आरमोरी – ७२.०
चातगाव – ६८.६
गडचिरोली – ६८.२
तसेच, अत्यंत मुसळधार पावसाचे (Very Heavy Rainfall) प्रमाण सात वर्तुळांमध्ये आढळून आले आहे:
देसाईगंज – १९६.०
मसेली – १६६.०
कोरची – १६५.४
शंकरपूर – १४०.०
कोटगुल – १२८.६
बेडगाव – १२२.४
कढोली – १२०.६
जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून सतत पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नदी-नाल्यांचे पाणीपातळी वाढल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोलीपाऊस #मुसळधारपाऊस #DesaiganjRainfall #कोरचीपावसाचीनोंद #तालुकावारपाऊस #GadchiroliWeatherUpdate #VeryHeavyRainfall #RainAlertGadchiroli #पावसाचाआढावा #गडचिरोलीजिल्हा