– विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचा शुभारंभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन परिसरात ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्यात आली असून, यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. ही संस्था लॉईड्स मेटल्स कंपनीच्या सहकार्याने भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने सुरू करण्यात आली आहे.
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेमार्फत Mining Engineering, Computer Science and Engineering, Manufacturing Technology, आणि Metallurgical Engineering या तीन वर्षीय अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांचे संचालन करण्यात येणार आहे. इच्छुक दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, जे DTE पोर्टलवर नोंदणीकृत आहेत, त्यांना ८ ते १० जुलै २०२५ या कालावधीत प्रवेशासाठी पर्याय भरता येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थी मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. मनीष उत्तरवार (प्रभारी संचालक, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था व संचालक, नवोन्मेष व सांघिक कार्य) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: ९८२२४६९६०९.
या उपक्रमामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, उद्योगजगतातील करिअरसाठी एक सक्षम आधार तयार होणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #GondwanaUniversity #EngineeringDiploma #TechnicalEducation #NewBeginnings #SkillDevelopment #RuralEducation #FutureEngineers #HigherEducation #CareerOpportunities #TechForTribes
#EngineeringForAll #GadchiroliDevelopment #StudentSupport #EducationMatters
#गोंडवाना_विद्यापीठ #तंत्रज्ञान_शिक्षण #अभियांत्रिकी_पदविका #शैक्षणिक_संधी #ग्रामीण_विद्यार्थ्यांसाठी_शिक्षण #नवीन_उपक्रम #विद्यार्थी_मदत_केंद्र #औद्योगिक_सहकार्य #गडचिरोली_विकास #शिक्षण_हक्क #भविष्याचे_इंजिनीयर #विद्यापीठ_तंत्रज्ञान_संस्था