The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभागाने गडचिरोली शहरात बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या स्कूल व्हॅनवर कठोर कारवाई केली आहे. शहरातील विविध शाळांच्या परिसरात राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल सात व्हॅन जप्त करण्यात आल्या असून, एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या कारवाईत वैध परवाना नसणे, विमा व फिटनेस कागदपत्रांची मुदत संपलेली असणे, विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, तसेच विद्यार्थ्यांची दप्तरं टपावर ठेवण्यासारख्या गंभीर अनियमितता उघडकीस आल्या. मिळालेल्या तक्रारींच्या आधारे उपप्रादेशिक परिवहन विभागाने ही मोहीम हाती घेतली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च जबाबदारी आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, शाळा व्यवस्थापन आणि पालकांनीही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची वैधता व सुरक्षितता तपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या तपासण्या आणि वाहतूक जनजागृती मोहिमा पुढील काळातही सुरू राहणार आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #SchoolVanCrackdown #StudentSafety #IllegalTransport #TransportDepartment #RTOAction #SchoolTransport #RoadSafety #MaharashtraNews #TrafficEnforcement
#गडचिरोली #SchoolVanAction #विद्यार्थी_सुरक्षा #TransportDepartment #RTOAction #IllegalTransport #SchoolSafety #वाहतूकनियंत्रण #MaharashtraNews #गडचिरोलीबातमी