पावसाळ्यात सुरक्षित प्रसूती आणि बालकांचे आरोग्य हेच प्राधान्य : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

42

-अहेरी महिला रुग्णालयाच्या कामावर नाराजी; टेलीमेडिसीन, लसीकरण, कुपोषणावर प्रभावी उपायांची गरज अधोरेखित
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : “पावसाळ्यात प्रसूती व बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही ढिलाई चालणार नाही,” असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला. जिल्हास्तरीय आरोग्य समित्यांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी सुरक्षित प्रसूती, अर्भक मृत्यू, मलेरिया, टीबी, कुपोषण आणि लसीकरण या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला.
पावसाळ्यात रस्ते बंद होण्याची शक्यता लक्षात घेता, संभाव्य गर्भवती महिलांना ‘माहेर घर’ योजनेतून संस्थात्मक प्रसूतीसाठी दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ‘बालमृत्यू सभा’ आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
कुपोषणाच्या समस्येवर दत्तक पोषण निरीक्षण, NRC भरती, घरपोच आहार वितरण अशा विविध उपाययोजना राबविण्याचे ठरले. जिल्हाधिकारी पंडा यांनी गट अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांना कुपोषित बालक दत्तक घेण्याचे आवाहनही केले.
जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला. तसेच अतिसाराच्या संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ORS आणि झिंक गोळ्यांचा साठा व जनजागृतीला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.
मलेरियाच्या तपासणीबाबत झालेल्या दुर्लक्षावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत तपासणी बंधनकारक करण्याचे आदेश दिले. तसेच टीबी रुग्ण ओळखण्यासाठी गावागावांत तपासण्या, एक्स-रे, व प्रयोगशाळा कर्मचारी नियुक्ती यावर भर देण्यात आला.
दुर्गम भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून टेलीमेडिसीन सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. अहेरी महिला रुग्णालयाच्या अपूर्ण कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत, निधीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले.
“सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून कृती आराखड्याची अंमलबजावणी गतीने करावी,” असे स्पष्ट निर्देश देत जिल्हाधिकारी पंडा यांनी पावसाळी आरोग्य नियोजनात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, हे अधोरेखित केले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, डॉ. प्रताप शिंदे, डॉ. माधुरी किलनाके, तालुका आरोग्य अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MonsoonHealthPlanning #SafeDelivery #MaternalAndChildHealth #MalnutritionPrevention #ChildMortality #VaccinationDrive #MalariaControl #TuberculosisScreening #Telemedicine #DistrictCollectorAvishyantPanda #AheriWomensHospital #ORS #StopDiarrheaCampaign #NRC #GadchiroliHealth
गडचिरोली #पावसाळी_आरोग्य_नियोजन #सुरक्षित_प्रसूती #कुपोषण_निर्मूलन #बालमृत्यू #लसीकरण_मोहीम #मलेरिया_नियंत्रण #टीबी_तपासणी #टेलीमेडिसीन #जिल्हाधिकारी_अविश्यांत_पंडा #अहेरी_महिला_रुग्णालय #ORS #Stop_Diarrhea #NRC #गडचिरोली_आरोग्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here