– डॉक्टर अटकेत
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि.०३ : छत्तीसगडमधील २६ वर्षीय तरुणीवर उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोरी गावात उघडकीस आली आहे. खाजगी डॉक्टर सुभाष हरिप्रसाद बिस्वास (वय ४८) याने आपल्या केबिनमध्ये तपासणीच्या नावाखाली तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
डॉक्टरने पीडितेला चेकअप बेडवर झोपवून तपासणीच्या नावाखाली जबरजस्ती लैंगिक छळ सुरू केला असता पीडिता घाबरून आरडाओरड करताच तिचा भाऊ तात्काळ आत धावत आला आणि डॉक्टरशी झटापट करत बहिणीची सुटका केली.
त्यानंतर पीडितेने पोमके बेळगाव येथे जाऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(ई) अंतर्गत विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.पुढील तपास कोरची पोलिस करीत आहे.
या विकृत कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #कोरची #गडचिरोली #डॉक्टरविनयभंग #BNS64(2)(इ) #महिलांविरोधातीलगुन्हे #खाजगीडॉक्टर #गुन्हा #पोलीसकार्यवाही #गडचिरोलीपोलीस #विनयभंग #भा.न्या.सं.२०२३ #महिला-सुरक्षा #MaharashtraCrimeNews #BreakingNews