The गडविश्व
कुरखेडा, दि.०३ : तालुक्यातील तळेगाव येथील मयूर रामचंद्र गद्देवार (वय २०) या युवकाने घरात पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
मयूरने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. सध्या तो कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करीत नव्हता, मात्र त्याच्या स्वभावात कोणताही अस्वस्थपणा जाणवत नव्हता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. घरच्यांच्या अनुपस्थितीत त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला फासावरून उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मयूरला मृत घोषित केले.
गडचिरोली जिल्ह्यात अलिकडच्या काळात युवकांमध्ये नैराश्य, बेरोजगारी, सामाजिक दबाव यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील दिशा न मिळाल्याने अनेक तरुण नैराश्यात जात आहेत.
मयूरच्या आत्महत्येमागे कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नसले तरी या घटनेने पुन्हा एकदा युवकांच्या मानसिक आरोग्यावर आणि समाजातील संवाद तुटण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
रात्री उशिरापर्यंत कुरखेडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद प्रक्रियेत होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गावात या घटनेने शोककळा पसरली असून, युवकांच्या भावनिक स्थितीबाबत समाज, शाळा, आणि कुटुंब यांना सजग होण्याची गरज असल्याचे जाणकार सांगत आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolinews #kurkhedanews
#SuicideCase #YoungManDies #MentalHealthAwareness #GadchiroliNews #Talegaon #YouthSuicide #TragicIncident #DepressionAwareness #RuralNews #IndiaNews
#तळेगाव #आत्महत्या #गडचिरोली #युवकमृत्यू #मानसिकदडपण #कुरखेडा #गावबातमी #शोकांतिका #वृद्धिंगतआत्महत्या #जिल्हावार्ता