The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा परिषदेतर्फे कृषी दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी वर्ग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि भात तसेच शिंगाडा लागवडीची प्रात्यक्षिके सादर केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रमात विविध कृषी उपक्रम राबवण्यात आले. आनंद पाल यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार, ‘गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजना’त लाभार्थ्यांना धनादेश वितरण, आणि कृषी विषयक मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यामध्ये डॉ. लाकडे (फळबाग व भाजीपाला), डॉ. किशोर झाडे (भात व तुर), प्रदीप तुमसरे (मृदा आरोग्य पत्रिका) आणि आनंद कांबळे (AI in Agriculture आणि “महाविस्तार” अॅप) यांनी आपले सत्र घेतले.
यानंतर सुहास गाडे यांच्या नेतृत्वात अधिकारी पथकाने पाथरगोटा गावात शेतकरी रामदास दोनाडकर यांच्या शेतात शिंगाडा लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले आणि काशिनाथ दोनाडकर यांच्या शेतात भात रोवणी केली. शेतकऱ्यांसोबत सजीव संवाद साधत, भात व शिंगाडा लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली.
या क्षेत्रभेटीत विनोद उद्धरवार (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा), नितीन पाटील (उपअभियंता, यांत्रिकी), शेखर शेलार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन), नारायण सरदार (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग), चेतन हिवंज (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा), रवींद्र कणसे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत), कावळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), मंगेश आरेवार (गटविकास अधिकारी आरमोरी), निलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी आरमोरी, अशोक कुर्जेकर सहाय्यक गटविकास अधिकारी आरमोरी, संदीप नाकाडे मंडळ कृषी अधिकारी आरमोरी, कृष्णदास दोनाडकर कृषी अधिकारी पंचायत समिती आरमोरी, योगेश रणदिवे कृषी अधिकारी आरमोरी तसेच आरमोरी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाने कृषी दिन साजरा करण्याला एक नवा आयाम मिळवून दिला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #KrishiDin #Gadchiroli #OfficialsOnFarm #PaddyCultivation #WaterChestnutFarming #ZPGadchiroli #SuhasGade #AgriInitiatives #Pathargota #AgriTechnology #AIinAgriculture #FarmerWelfare #GopinathMundeScheme #FarmerEmpowerment
#कृषीदिन #गडचिरोली #शेतकरीबांधावरअधिकारी #भातलागवड #शिंगाडालागवड #जिल्हापरिषदगडचिरोली #सुहासगाडे #कृषीउपक्रम #पाथरगोटा #कृषीतंत्रज्ञान #AIinAgriculture #गोपीनाथमुंडेयोजना #शेतकरीसमृद्धी