The गडविश्व
ता.प्र / धानोरा , दि. ०२ : तालुक्यातील नवरगाव येथे १ जुलै २०२५ रोजी कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच रंजनाताई शिडाम होत्या. तालुका कृषी अधिकारी चौधरी व कृषी अधिकारी प्रल्हाद पदा यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, योग्य बियाण्यांची निवड, सिंचन प्रणाली व पेरणी तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. धानावरील रोग व उपाययोजना यासंबंधीही माहिती देण्यात आली.
प्रमुख उपस्थितांमध्ये पी. यू. किल्लनाके (कृषी विस्तार अधिकारी), के. जी. नेवारे व कवीश्वर बनपूरकर (ग्रामपंचायत अधिकारी), सदस्य कपिल कोवा, साईनाथ गेडाम, नामदेव नरोटे, बाजीराव वालको, पोलीस पाटील अक्षम पदा यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक ठाकरे यांनी, सूत्रसंचालन रवींद्र मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन विकेश मडावी यांनी केले. ग्रामसेवक खुशाल नेवारे व कृषी सहाय्यक शेडमाके यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात ७५ शेतकरी व महिला सहभागी झाले होते.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #KrishiDin #KharifSeason #Navargaon #Dhanora #FarmerAwareness #Gadchiroli #AgricultureDepartment #VasantraoNaikJayanti #AgriWorkshop #FarmerWelfare #TalukaAgricultureOfficer #PanchayatInitiative
#कृषीदिन #खरिपहंगाम #नवरगाव #धानोरा #शेतकरीमार्गदर्शन #गडचिरोली #कृषीविभाग #वसंतरावनाईकजयंती #कृषीमेळावा #शेतकरीहित #तालुकाकृषीअधिकारी #पंचायतीउपक्रम