– गोंडवाना कला दालनात सभा; तहसीलदार आष्टीकर यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 9 जुलै 2025 रोजी महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दुपारी 1 वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, 13 जून 2025 ते 12 जून 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 51 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रातील 34 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण तर अनुसूचित क्षेत्रातील 17 ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण निश्चित होणार आहे.
आरक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार पार पडेल, असे स्पष्ट करत तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroli
#गडचिरोली #ग्रामपंचायतआरक्षण #सरपंचसोडत2025 #ग्रामविकास #गोंडवाना_कला_दालन #तहसीलदारआष्टीकर #स्थानीयस्वराज्य