कृषी विद्यार्थ्यांनी पटवून दिले वैराणीवर युरिया प्रक्रियेचे महत्त्व

86

The गडविश्व
ता.प्र / चामोर्शी, दि. १६ : केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण उद्योजकता जागृती विकास (READY)’ या कार्यक्रमाअंतर्गत फोकुर्डी गावात वैराणीवर युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. या प्रक्रियेमुळे जनावरांचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुलभ होते, दूध उत्पादनात वाढ होते, चाऱ्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढते आणि हिरव्या चाऱ्याचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया अतिशय उपयुक्त ठरते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम, कार्यक्रम अध्यक्ष प्रलय झाडे, समन्वयक छबिल दुधबळे, अधिकारी पवन बुधबावरे आणि विषयतज्ज्ञ श्रीकांत सरदारे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांपैकी सिद्धांत उंदिरवाडे, प्रणय रोडके, क्षितिज शेंडे, सुरज शेंडे, चंद्रशेखर निमकर आणि श्रेयस पिपरे यांनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here