अबुझमाडमध्ये अटक केलेल्या माओवादींचा अल्पवयीनतेचा दावा खोटा ; दोघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

65

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : अबुझमाड परिसरातील बिनागुंडा येथून २० मे रोजी अटक करण्यात आलेल्या पाच माओवाद्यांपैकी दोघांनी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र, २२ मे रोजी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालानुसार, हे दोघेही प्रौढ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज २३ मे रोजी या गुन्ह्यातील उर्वरित आरोपी राधिका बुचन्ना मडावी (सदस्य प्लाटून ३२)व पोडिया आयतु कुंजाम (सदस्य प्लाटून ३२)या दोघांना कायदेशीर अटक करण्यात आली. राधिका मडावी चा राहता पत्ता नेंडरा, ता. बासागुडा, जि. बीजापूर (छत्तीसगड) आहे. तर पोडिया कुंजाम देखील मरतुर, जि. बीजापूर (छत्तीसगड) येथील आहे.
अटकेनंतर दोघांना चामोर्शी येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाहेरी उपपोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्र. ३/२५ या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपास सुरु आहे.
पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरात माओवादी हालचालींच्या पार्श्वभूमीवर सतर्कता अधिक वाढवण्यात आली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalarrest #ipl2025 #mansun )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here