गडचिरोली : पोलीस – नक्षल चकमक उडाली, चार नक्षली ठार

3473

– परिसरात शोधमोहीम सुरूच
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नुकत्याच उघडलेल्या कवंडे पोलीस स्टेशन परिसरात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत चार कट्टर नक्षली ठार झाले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
विश्वासार्ह गुप्त माहितीनुसार, कवंडे आणि नेलगुंडा परिसरातून इंद्रावती नदीच्या काठावर नक्षल्यांच्या हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सी-६० चे १२ पथके (सुमारे ३०० कमांडो) आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी संयुक्तपणे मुसळधार पावसात शोधमोहीम सुरू केली.
आज सकाळी नदीकाठावर वेढा घालत असताना नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. सी-६० कमांडोंनी तत्काळ प्रत्युत्तर देत सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीत चार नक्षली ठार केले. घटनास्थळी स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल, दोन .३०३ रायफल्स, एक भरमार, वॉकी टॉकी, नक्षल साहित्य आणि कॅम्पिंग साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सध्या उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम आणि नक्षलविरोधी कारवाया सुरू आहेत. गडचिरोली पोलिसांची ही कामगिरी नक्षलविरोधी लढ्यातील एक मोठे यश मानली जात आहे.

#thegdv #thegadvishva #gadchiroli news #gadchirolipolice #c60 #naxal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here