– कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण ; पक्षनेत्यांचा विश्वासाला दिला मान
The गडविश्व
आरमोरी, दि. २३ : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ते सुनील नंदनवार यांची पक्षाच्या विधानसभा सह-अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते जाहीर झाली असून, संपूर्ण कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
आपल्या नियुक्तीचे श्रेय नंदनवार यांनी माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, सरचिटणीस युनूस शेख, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी आदी वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.
या नियुक्तीनंतर विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले, तालुका अध्यक्ष अमीन लालानी, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे यांच्यासह जिल्हा, तालुका व शहरस्तरीय विविध पदाधिकाऱ्यांनी सुनील नंदनवार यांचे हार्दिक स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिला आघाडी, सोशल मीडिया सेल, युवक आघाडी, विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील अभिनंदनाचे सलग फेरे घालून त्यांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा दर्शवला.
सुनील नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा लाभ पक्षाला आगामी निवडणुकांतही नक्कीच मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
