मानव विकास मिशनअंतर्गत दखणे विद्यालयात १८ विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वितरण

114

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : मुरुमगाव येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सत्र २०२४–२५ करिता पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या १८ विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.
माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मुरुमगाव परिसरातील कुलभट्टी, पन्नेमरा, बेलगाव, रिडवाही आदी गावांमधून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा शालेय प्रवास अधिक सुकर झाला आहे.
या उपक्रमासाठी शाळेने विद्यार्थिनींचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवले होते. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सायकल वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
या वेळी मुरुमगावचे सरपंच शिवप्रसादजी गवर्णा, आदिवासी विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कमलाबाई दखणे, शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर, तसेच के. आर. दखणे, शिक्षक महेंद्र जांभुळकर, सतीश सुरणकर, घनश्याम चिंचोलकर, विलास चौधरी, रमेश निसार, रामाधर राणा, सुरेश तुलावी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पालकांच्या साक्षीने १८ विद्यार्थिनींना सायकल वितरित करण्यात आल्या. हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारा ठरतोय, अशी प्रतिक्रिया पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here