“तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा” : गडचिरोलीत उत्साहात साजरा झाला राष्ट्रीय डेंग्यू दिन

112

The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन गडचिरोली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. “तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा – डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा” या संकल्पनेवर आधारित उपक्रमांनी जिल्हाभरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगल येथे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. सरपंच ममता दूधबावरे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रभातफेरीमध्ये आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात डेंग्यूचा प्रसार, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रफुल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर भोयर, उपसरपंच तेजप्रभा भोयर, तसेच ग्रामपंचायत सदस्य मीना मेश्राम, विश्वनाथ भोयर, ग्रामविस्तार अधिकारी नीलकंठ मारगाये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके, साथरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम, डॉ. बागराज धुर्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला येथील डॉ. बासू नरोटे व डॉ. पूजा धुळे मंचावर उपस्थित होते.
डेंग्यू एडिस इजिप्ती डासामुळे होतो, जो स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे, पाण्याच्या साठ्यांवर झाकण ठेवण्याचे, कुलर व ड्रिप पॅन स्वच्छ ठेवण्याचे, नाल्यांची सफाई करण्याचे, तसेच गप्पी मासे सोडण्याचे आवाहन करण्यात आले.
डेंग्यूची लक्षणे – ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, अंगदुखी, पुरळ, उलट्या, भूक मंदावणे आणि रक्तस्त्राव – यांची माहिती देत नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत ‘इलायझा चाचणी’ करून घ्यावी, असे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here