गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला तातडीची मदत

89

– सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते ५० हजारांची नुकसान भरपाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील इंदिराबाई सहारे या रानटी हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल घेत जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात भेट देत त्यांच्याशी संवाद साधला व तब्येतीची चौकशी केली.
या वेळी वनविभागामार्फत नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांनी वनविभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या हानीप्रकरणी नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देणे आवश्यक आहे, यावर भर देत जयस्वाल म्हणाले की, “कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही.”
या प्रसंगी आमदार रामदास मसराम, संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहपालकमंत्र्यांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला दिलासा मिळाला असून, प्रशासनाची संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here