The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि. ११ : गडचिरोली तालुक्यातील दिभना येथून लाखांदूरमार्गे वडसा कत्तलखान्याकडे गाईंची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठी धडक कारवाई करत संबंधित गाडी ताब्यात घेतली.
MH 40 BG 9263 क्रमांकाच्या ‘छोटा हत्ती’ गाडीमधून गाईंची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच साप्ताहिक मिलनचे जिल्हा प्रमुख लोकेश माकडे यांनी तात्काळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संपर्क करून माहिती दिली. केवळ १० मिनिटांत सर्व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि तस्करी रोखण्यात यश मिळवले.
या कारवाईत संयोजक अमन गैरवार, गौरक्षा प्रमुख शुभम हिंगणे (आरमोरी), तुषार ठाकरे, जोगीसाखरा संयोजक महेश राऊत, रवी मोहरले, शूरवीर गुरनुले, स्वप्निल करफळे, तन्मय कांबळे, हर्ष नारनवरे, प्रविण बेंदेवार, युवा दल अध्यक्ष विशाल ठाकरे, सचिव समीर भंडारे, लती प्रधान आदी कार्यकर्ते सक्रिय होते.
तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक दर्वे बापूसाहेब, मंगेश ढोरे, आणि मोहीत ढोरे, साहिल जांभुळे, अक्षय सहारे यांचीही उपस्थिती होती.
गाडी व तस्कर अहजाज कुरेशी याच्याविरोधात आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात गौहत्या रोखण्यासाठी बजरंग दलाची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. जय श्रीराम च्या घोषणांसह गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
