बारावी नापास झाल्याच्या नैराश्यात वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थ्याची आत्महत्या

39

The गडविश्व
गोंदिया – आमगाव, दि. ०८ : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याच्या नैराश्यातून स्वतःच्याच वाढदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. क्रिष्णा आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. निकालात आपले मित्र उत्तीर्ण आणि आपण मात्र अनुत्तीर्ण झालो, यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. ७ मे रोजी त्याचा वाढदिवस असूनही त्याने दुपारी दोनच्या सुमारास घरी कोणी नसताना गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
क्रिष्णाचे वडील धर्मराज शिवणकर आमगावमध्ये एक छोटे हॉटेल चालवतात. चहा-नाश्त्याच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. क्रिष्णा सुट्टीच्या दिवशी वडिलांना मदत करत असे. त्यांच्या मेहनती कुटुंबावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

#thegdv #thegadvishva #gondianews
गोंदिया बातमी, आत्महत्या बारावी विद्यार्थी, महाराष्ट्र १२वी निकाल २०२५, गोंदिया आत्महत्या बातमी, विद्यार्थ्याचे नैराश्य, student suicide Maharashtra, board exam failure depression

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here