The गडविश्व
गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. सदरच्या माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. यामधे प्रश्नमंजूषा स्पर्धा, व्हिडिओ चित्रण स्पर्धा, भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा, गायन स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा इत्यादींचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाव्दारे सदरच्या स्पर्धेचे नियोजन २५ जानेवारी २०२२ ते १५ मार्च २०२२ दरम्यान नियोजन केले आहे. यामध्ये विविध श्रेणी आणि विविध पारितोषिके आहेत. याविषयी सविस्तर माहिती वेबसाईटवरून प्राप्त करता येईल. (https://ecisveep.nic.in). स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असल्यामुळे स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.
