महाराष्ट्रातील संपादकांनी घेतली राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट
The गडविश्व
जयपूर, दि. २९ : असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून वृत्तपत्राचे संपादक उपस्थित राहिले होते. दरम्यान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजभवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी गोरख तावरे(कराड), मुकुंद जोशी (गडचिरोली), नेताजी मेश्राम (चंद्रपूर), शोभा जयपुरकर (नागपूर) उपस्थित होते. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान अधिवेशनासंबंधी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी माहिती जाणून घेतली. महाराष्ट्राच्या प्रतिनिधीनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना अधिवेशनासंबंधी सविस्तर माहिती दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी केशवदत्त चंडोला (कानपूर) यांची निवड झाल्याची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली.
अपरिहार्य कारणास्तव असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्युज पेपर ऑफ इंडिया संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मला उपस्थित राहता आले नाही अशी खंत ही राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
