गडचिरोली नगर परिषदची मोठी कारवाई : 10 मालमत्ता सील, लाखोंची कर वसुली

775

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : नगर परिषद गडचिरोलीच्या आदेशानुसार थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. कर वसुली पथक व पोलिसांच्या सहकार्याने थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करत 10 मालमत्ता सील करण्यात आल्या.
जप्तीच्या भीतीने अनेक मालमत्ता धारकांनी त्वरित कर भरला, त्यामुळे 12.86 लाख वसूल करण्यात आले. या कारवाईत कर अधीक्षक मोरेश्वर पेंदाम, कर निरीक्षक स्वप्नील घोसे, निलेश करमणकर, शैलेंद्र बुक्कावार,
सुनील पुण्यप्रेड्डीवार कर लिपिक, अमित भांडेकर नगर रचना लिपिक, अशोक रामटेके कर लिपिक, शशिकांत गजभिये लिपिक, कैलास डुंबरे कर लिपिक, खुशाल बाळेकरमणकर, बबू शेख, रमेश मुरमुरवार, नंदेश्वर कतले, विनोद पीपरे, सुनील कटाईत, संतोष मुंघांटे, स्वप्नील खोब्रागडे, दिनेश धोटे,धीरज रामगिरवार, अनिल शिवणकर,तुषार किरमे, राकेश येरमलवार,अविनाश वाटगुरे आदी कर्मचारी यावेळी उपस्तिथ होते. थकीत व चालू मालमत्ता धारकांनी कराचा त्वरित भरणा करून भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन नगर परिषद मार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here