The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने २८ मार्च रोजी महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील 40 नामांकित कंपन्या सहभागी होणार असून सुमारे 10 हजारांहून अधिक उमेदवार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात निर्मिती, आयटी, ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग आदी क्षेत्रातील कंपन्या विविध पदांसाठी भरती करणार आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवडून तिथल्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी abhijitwanjari.com या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 3,000 हून अधिक उमेदवारांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
सकाळी 10 वाजता आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, विद्यार्थी आणि पालकांसाठी अभ्यागत, नोंदणी व माहिती कक्ष उभारण्यात येणार आहेत. उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पदवीधर बेरोजगारांसाठी ही सुवर्णसंधी असल्याने जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

#Employment #JobFair #Gadchiroli #CareerOpportunities #Graduates #MegaJobFair #AbhijitWanjari #GovindraoWanjariFoundation #JobSeekers #MaharashtraJobs
#रोजगार #नोकरीमेळावा #गडचिरोली #करिअरसंधी #पदवीधर #मेगारोजगारमेळावा #अभिजितवंजारी #गोविंदराववंजारीफाउंडेशन #नोकरीसंधी #महाराष्ट्ररोजगार