The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आजच्या डिजिटल युगात, वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या तुलनेत ऑनलाइन पोर्टल्स हे वेगवान आणि सहज उपलब्ध असलेले माध्यम बनले आहे. इंटरनेटद्वारे तुम्ही कुठेही आणि कधीही ताज्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
‘The गडविश्व’ हे २०२२ पासून बातम्या, घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविण्याचे निरंतर कार्य करीत असून वाचकांचा भरघोस असा प्रतिसादही मिळताना दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप ग्रुप, इन्स्ट्राग्राम, एक्स, कू आदी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बातम्या प्रसारित करण्याचे काम सुरू आहे. आता वाचकांना बातम्यांसह GDPL क्रिकेट सामने अनुभवता येणार आहे.

The गडविश्व हे विविध ऑनलाईन प्रक्षेपण वाचकांना बातम्यांसह उपलब्ध करून देत असते. त्यामुळे वाचकांचा बातम्यांसह लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा अनुभवता येत आहे.
ऑनलाइन पोर्टल हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असते, जिथे विविध श्रेणींतील बातम्या आणि माहिती प्रकाशित केली जाते. न्यूज वेबसाइट्स, न्यूज ॲप्स, सोशल मीडिया न्यूज पेजेस, यूट्यूब न्यूज चॅनेल्स हि डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. या माध्यमातून आजच्या घडीला बातम्यांची, माहितीची देवाण घेवाण केली जा आहे.
ऑनलाइन पोर्टलवर बातम्या वाचण्याने ताज्या घडामोडी तत्काळ उपलब्ध होऊन कुठल्याही वेळेस अपडेट्स मिळतात, मोफत आणि सोपे प्रवेश फक्त इंटरनेट असणे गरजेचे आहे, विविध श्रेणींतील बातम्या जसे राजकारण, क्रीडा, तंत्रज्ञान, मनोरंजन इत्यादी, व्हिडिओ आणि फोटो अपडेट्स वाचनासोबत दृश्य माध्यमांची जोड, थेट प्रक्षेपण (Live News) लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे त्वरित माहिती मिळते.
ऑनलाइन पोर्टल हे वेगवान, सोयीस्कर आणि विश्वसनीय माध्यम आहे. विविध न्यूज पोर्टल्सचा योग्य वापर करून आपण समाजातील घडामोडींची माहिती मिळवू शकतो.
(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolipolice #gdpl #livecricket #forestgadchiroli )