गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर केला लैंगिक अत्याचार

2993

– आरोपीस केली अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना गडचिरोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी मनोज सुंदरलाल धुर्वे (वय ३० ) रा. आलपल्ली ता.अहेरी जि.गडचिरोली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हा गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई आहे. आरोपी व पिडीत युवतीची फेसबुकच्या माध्यमातुन ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने युवतीची शारीरिक संबध प्रस्थापित करण्याची मागणी मनोज ने केली. दरम्यान पिडीत युवतीने मनोजकडे लग्न करण्याची मागणी केली असता आरोपी मनोजने लग्नाचे वचन देत पीडितेवर वारंवार लैगिक अत्याचार केला व १० फेब्रुवारी २०२५ पासून युवतीशी बोलने बंद करून लग्नास स्पष्ट नकार दिला. लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याबाबत पिडीत युवतीने गडचिरोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असता पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस शिपाई मनोज धुर्वे विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
(#thegdv # thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #crime #crimegadchiroli #mahashivratri #mahadev #rachin ravindra #royal challengers vs warriorz #rcb vs upw #बांगलादेश बनाम न्यूजीलैंड #nse holidays 2025 #all of us are dead #
kolkata earthquake )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here