The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २१ : तालुक्यातील निमगाव येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली द्वारा पुरस्कृत गुरुदेव सत्संग सेवा मंडळ निमगाव (रांगी ) च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात सर्व संत स्मृतिदिन शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ ते रविवार २३ फेब्रुवारी २०२५ ला निमगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक निमगाव येथे साजरा करण्यात येत आहे.
गावातील सर्व भाविक भक्त व नागरिकांच्या वतीने हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. गाव आदर्शवत होण्याच्या दृष्टीने रोज सामूहिक ध्यान, सामाईक प्रार्थना, ग्रामसफाई, प्रवचन, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाची घटस्थापना शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ सांय.६. ०० शामराव नैताम ग्रामसेवाधिकारी लांजेडा, मार्गदर्शन दिलीप मेश्राम ग्रामसेवक गडचिरोली, जागृती कार्यक्रम ह.भ.प. प्रणिता शंकर पिपरे चामोर्शी यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे. तर रविवार २३ फेब्रुवारी २०२५ ला पहाटे ५.०० वा ध्यान पाठ व मार्गदर्शन असून सकाळी ७.०० वाजता पालखी मिरवणूक, ८.३० वाजता ध्वजारोहण, १०.०० वाजता ग्रामगीता वाचन आणि दुपारी १२.०० वाजता गोपाळकाला व किर्तन यांचा आयोजन केलेला आहे. तरी संबंधित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
